J Phulun yeta | जे फुलून येतं | poem by Vaishnavi Ganesh Zirpe (Kadam)
जे फुलून येतं
जे फुलून येत तेच
केव्हातरी सुकून जात
जे जास्त जपल्या जात
तेच पटकन तुटतं
जे एकत्र गुंतत तेच
आपोआप उसवत
जे फार शोधून सापडत
तेच हरवून जात
जे खुप निभावल्या जात
तेच पोकळ राहत
जे घट्ट बांधल्या जात
तेच कधी कधी अलगद सुटतं
.... वैष्णवी गणेश झिरपे { कदम }

Comments
Post a Comment
If you guys have any doubt, the pls suggest