हॉस्टेल ची मुलगी | Hostel chi mulgi marathi poem | Vaishnavi Ganesh zirpe (Kadam)
हॉस्टेल ची मुलगी
हॉटेलची मुलगी म्हणटल की मुलांच्या तोंडात पटकन नको येते पण जरा बघा हॉस्टेल ची मुलगी कशी असते
बडबड जरा जास्त करते पण
सारे तिच्या मनातूनच निघते
धावपळीत सगळे काम वेळेवर करायला तिलाच जमते
कितीही थकली तरी समोरच काम करायला ती रेडीच असते
काहीही अॅडजेस्टकरायला एका पायावर तयार असते
नाते नसतानाही ती माणसांना जोडून ठेवते
मैत्रीण रडताना विचार न करता ती स्वतःची शपथ घालते ओळखीच्यानाच काय ती अनोळखीना ही भैय्या म्हणते
छोट्या छोट्या गोष्टीचही डोंगरा एवढं टेन्शन घेते
स्वतःचा कमी पण दुसऱ्यांचा जास्त विचार करते
आई वडिलांजवळ मुली कमी राहतात आणि ती फारच कमी राहते रडायचं असेल तर ब्लॅकेट मध्ये रडते
मोठ्यांचा आशिर्वाद घ्यायला पटकन झुकते
नाते सारे निभावताना ती स्वतःलाच विसरून जाते
खर तर हॉस्टेल ची मुलगी अशी असते
फक्त आपली विचार करण्याची पद्धत चुकते
... वैष्णवी गणेश झिरपे (कदम)

Comments
Post a Comment
If you guys have any doubt, the pls suggest